पहलगाम हल्ल्यानंतर आतंकवादाला मुळापासून संपवण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगला धडा शिकवला,
आपल्या भारत देशाने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला अक्षरशः गुडघे टेकावे लागले, या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे तिरंगा यात्रेचे दिनांक 18 मे रोजी सकाळी 9 वाजता आयोजन केले असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदीप दादा कंद यांनी सांगितले,
शिरूर हवेली मतदारसंघात भारतीय जनता पार्टीशी कायम एकनिष्ठ असणारे कंद यांनी विविध प्रकारच्या महाराष्ट्रीयन कुस्ती स्पर्धा तसेच हिंदुत्ववादी मुद्द्यांना कायम प्रोत्साहन दिले आहे,
पहलगाम हल्ल्यानंतर पुणे जिल्ह्यातील जनतेच्या भावना खूपच दुखावल्या गेल्या होत्या, परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही महत्त्वाच्या निर्णयानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले, आतंकवादी हल्ल्यानंतर मातृशक्तीच्या कपाळावरील पुसण्यात आलेल्या चुटकी भर सिंदूर, कुंकवाची किंमत काय असते, हे ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय लष्कराने दाखवून दिले,
या क्षणाची आठवण म्हणून पुणे जिल्हा पूर्वपट्ट्यातील राजकारणात कायम छाप असणारे सर्वांचे आवडते प्रदीप दादा कंद यांनी तिरंगा यात्रेच्या आयोजन केले आहे, या यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन कंद यांनी केले आहे,