टिळेकरवाडी ग्रामपंचायत निवडूक बिनविरोध

Bharari News
1 minute read
0
हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 
        टिळेकर वाडी व खामगाव ता (हवेली )टेक एकत्र असलेले गाव दोन ग्रामपंचायतीने ओळखले जाणार आहे त्यामध्ये टिळेकरवाडी ची प्रथमच निवडणूक होत असून संपूर्ण  ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे. 
  श्री गणेश टिळेकर कल्पना टिळेकर सुभाष लोणकर गोवर्धन टिळेकर सुषमा टिळेकर वैशाली  चौरे सुशील राऊत नंदा राऊत प्रियांका कांबळे वरील सर्व सदस्य बिनविरोध निवड झालेली आहे.    
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्व इच्छुक उमेदवार व बिनविरोध निवड झालेल्यांचे ज्यांच्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन  राजेंद्र टिळेकर अध्यक्ष संतोष टिळेकर पोलीस पाटील विजयराव टिळेकर आबासाहेब टिळेकर सदाशिवराव टिळेकर वसंतराव पिंगळे संतोष राऊत विलास बनकर अतुल टिळेकर व सर्व इच्छुक उमेदवार यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास मोलाचे सहकार्य लाभले. राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य काम करणार असल्याचे काही सर्व सदस्यांनी दिली व गावातील विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यावेळी  राजेंद्र टिळेकर यांनी सर्वांचे आभार व अभिनंदन केले. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल अशा प्रशासकाच्या वतीने हवेली तालुक्याच्या तहसीलदार  तृप्ती  कोलते यांनी सर्व ग्रामस्थांचे  व निर्वाचित सदस्यांचे आभार व अभिनंदन केले. निवडणूक अधिकारी  खाडे व ग्रामसेविका बोराटे मॅडम यांचे सहकार्य लाभले सुभाष टिळेकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 18, June 2025