हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, शिववृत्त पोलीस मित्र माहिती अधिकार संरक्षण सेना, भारतीय महाक्रांती सेना आयोजित सामाजिक, शैक्षणिक प्रशासकीय सेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2022 चे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड पुणे येथे करण्यात आले होते
सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते यावर्षी सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे व उल्लेखनीय कार्य करणारे हवेली तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत सुभाष पाटोळे यांची या पुरस्कारासाठी निवड समितीने निवड करून एका सच्या कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल सर्व स्तरातून श्रीकांत पाटोळे यांच्यावर अभिनंदन होत आहे याप्रसंगी श्रीकांत पाटोळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता,