व्यावसायिक शिक्षण काळाची गरज – जालिंदर पठारे

Bharari News
1 minute read
0

 

आंबेगाव मिलिंद टेमकर 
              गावडेवाडी (ता.आंबेगाव ) येथील श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिरकणी विद्यालयात महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ यांच्या वतीन गुणवंतांचा गुणगौरव समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.                    
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वास्तव मराठी मिडियाचे संपादक संदिप खळे   हे होते. यावेळी बोलताना आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे म्हणाले की, हिरकणी विद्यालयाने काळाची पाऊले ओळखून कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण २००८ पासून सुरु केले. सरकारने आता अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश केला आहे. विद्यालयात विविध उपक्रम अनेक संस्थांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.           
यावेळी मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुनिल एकनाथ गावडे, कार्याध्यक्ष अनिल खंडू गावडे, सचिव प्रविण बबनराव गावडे,  संचालक  ज्ञानेश्वर गावडे , बाळासाहेब गावडे, अशोक डोंगरे , विजय गावडे, लता शिंदे, सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गावडे, मेंगडेवाडी केंद्रप्रमुख शत्रुघ्न जाधव, वनरक्षक पूजा पवार, वनपाल संभाजी गायकवाड, विविध दैनिकांचे पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल पारगाव मंडलाधिकारी विश्वास शिंदे , महावितरणचे कुणाल दळवी, विद्यालयास १०० खुर्च्या व ५० स्टूलस भेट दिल्याबद्दल बाळूबुवा बळवंत गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील इ.१० वी मध्ये प्रथम क्रमांक सृष्टी दौलत शिंदे , द्वितीय क्रमांक धनश्री संजय हिंगे, तृतीय क्रमांक तनुजा गुरुदत्त हिंगे, चतुर्थ क्रमांक अदिती दत्तात्रय गावडे , पाचवा क्रमांक अनुष्का विजय गावडे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक अनुष्का वीरसेन गावडे तसेच जळगाव येथील शेती विषयक राज्यस्तरीय प्रदर्शनात द्वितीय क्रमांक आलेल्या अनुष्का किसन गावडे , अदिती शरद शिंदे , साक्षी पांडुरंग वाळूंज, तनिष्का संतोष गावडे, अनुष्का वीरसेन गावडे, तन्वी संतोष गावडे  व मार्गदर्शक शिक्षक सायली पवार, नितीन भालेराव यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती दहितुले, मनीषा कदम , निवृत्ती हुले, विठ्ठल रासकर प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद बोंबले तर आभार मनोज तळेकर यांनी मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 20, June 2025