सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
दोन वर्ष कोरोना महामारी मुळे पंढरीची वारी बंद असल्यामुळे यावर्षी वारकरी व भावीकांची एकादशी आधीच ३ दिवसापासून मोठ्या संख्येने भावीक येवून एकादशी दिवशी होणाऱ्या गर्दी आधीच चंद्रभागा स्नान करून विठ्ठलाचे दर्शन करून परतत आहेत . यावेळी येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या वीस लाखावर पोचेल असे बोलले जाते , पण त्यातील अर्धे सावधगिरी म्हणून आधीच येवून जाणे पसंत करतात , असे नागपुर , औरंगाबाद , पुणे मुंबईहून आलेल्या भावीकांसी बोलल्यावर कळते . पिंपरी व वाकड येथून फोटोतील दोन भावीक तर चक्क सायकलवर आलेत, ७० वर वय असताही दोन मुक्काम करून अडीच दिवसात पोचले . यावेळी पंढरपुर महानगर पालीकेने खबरदारी म्हणून औषध फवारणी, पाणी शुद्धीकरण, स्वच्छता व वारकर्यां साठी नदी किनारी हजारावर संडासची व्यवस्था केली आहे .
दानशुर दात्यांनी देहू आळंदी पिंपळनेर पासून वारकर्यांना नाष्टा जेवण आसरा देवून सद्भाव दाखविला . कोरोनाचे सावट कमी असले तरी गावोगावचे मुक्कामी कुठे खोकला ताप जाणवाता त्या वारकर्यांला मागे परत पाठवले जाण्याची व्यवस्था दिंडी चालक करत आहेत . पंढरपुर पोलिसांच्या मदतीला आलेल्या महाराष्टातील इतर भागातून आलेल्या पोलीसांकडून भावीकांना मदतीची भावना जाणवली . हा सुख सोहळा स्वर्गी नाही असे पुणवरून सायकलवर आलेल्या भावीकांनी सांगीतले . नामदेव पायरीपासून चंद्रभागा तिरापर्यंत भावीकां ना रांगेत दर्शना साठी पोलीस सहाय्यभूत ठरत होते .