वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश

Bharari News
1 minute read
0


लोणी काळभोर अनिकेत मुळीक
        आपला वाढदिवस साजरा करताना तो नेहमीच पर्यावरण पुरक असला पाहिजे या विचाराचे माहिती सेवा समितीचे हवेली तालुका उपाध्यक्ष *अजित मोहन साळुंखे* यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर रामदरा परीसरात १०० झाडांचे वृक्षारोपण केले.  
यावेळी बोलताना  *चंद्रकांत वारघडे सर - अध्यक्ष माहिती सेवा समिती* म्हणाले आपणा सर्वांना कोरोनामुळे आॅक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. तसेच वृक्षारोपण करुन आपला वाढदिवस खरोखरच पर्यावरणपुरक साजरा केला आहे. तो समाजासाठी व विशेष करून तरुणांसाठी एक दिशा दर्शक आहे. *ग्रीन फाउंडेशन मार्फत* 
  रामदास कोळपे वस्ती याठिकाणी अनेक जणांच्या वाढदिवसा निमित्त जंगली रोपांची लागवड व त्याचे शंभर टक्के संवर्धन केले जात आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी साठी
शिरूर, हवेली परीसरात लाखो झाडे लाऊन जगवणारे वृक्ष मित्र  *चंद्रकांत वारघडे सर अध्यक्ष - माहिती सेवा समिती अजित मोहन साळुंके यांना  माहिती सेवा समिती हवेली तालुका उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र वारघडे यांचे हस्ते देण्यात आले.* 
     कार्यक्रमासाठी  उपस्थीतामध्ये   कमलेश बहिरट अध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समिती ,सतीश जगताप संघटक माहिती सेवा समिती, अमित साळुंके, मयूर साळुंके, प्रज्योत साळुंके, विनोद जाधव, शंकर पवार, ऋतिक काळभोर, बापू काळभोर, अवि कोळपे, नामदेव केसकर, दिपक काळभोर, प्रविण काळभोर, विकास काळभोर, अभिजीत भंडलकर, सुनिल लांडगे, पत्रकार अनिकेत मुळीक, अजिक्य उपाध्ये अजय पवार, प्रकाश डोळस, प्रतीक खंडेलवाल ,व इतर मान्यवर उपस्थित होते.
   येत्या वर्षभरात १००० झाडे लाऊन ती जगवण्याचे आश्वासन अजित साळुंखे यांनी दिले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 18, June 2025