धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पाचा ईतर गावांनी आदर्श घेतला पाहिजे.- समिक्षा गोकुळे (उपजिल्हाधिकारी संभाजीनगर)

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
     माहिती सेवा वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष धर्मराज बोत्रे, पिंपळे जगताप ग्रामस्थ  यांचे माध्यमातून पिंपळे जगताप (ता शिरूर) याठिकाणी धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प साकारत आहे आज अखेर १५००० हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे २०१७ पासून बकोरी देवराई वनराई प्रकल्प बकोरी येथे साकारत आहे त्याठिकाणी ३०००० झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले आहे.    
आज पिंपळे जगताप याठिकाणी ३०० झाडांचे वृक्षारोपणाची सुरुवात  मा, समिक्षा गोकुळे मॅडम यांचे हस्ते करण्यात आली तेंव्हा त्या बोलत होत्या.२ आक्टोंबर पासून सुरू केलेले वृक्षारोपण परंतु एवढ्या कमी कालावधीत १५००० देशी झाडे लावण्यात आल्याबद्दल त्यांनी सर्व वृक्ष मित्रांचे कौतुक केले.तसेच त्याठिकाणी वृक्षदाण करणारे उद्योजक सागर भाडळे, उद्योजक राहुल (दादा) गव्हाणे यांचेही  गोकुळे मॅडम यांनी आभार मानले.
   तसेच एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी योग आला व एक वेगळे समाधान लाभल्याचे अरविंद गोकुळे (वरीष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन ) यांनी सांगितले व बकोरी देवराई वनराई प्रकल्प, धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प अशाप्रकारे शेकडो प्रकल्प साकारण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     सदर कार्यक्रमांसाठी उपजिल्हाधिकारी  समिक्षा गोकुळे मॅडम, वरीष्ठ पोलिस निरीक्षक  अरविंद गोकुळे साहेब, या प्रकल्पासाठी लाखो रुपयाची झाडे दान दिली ते वाघोली येथील उद्योजक  सागर  भाडळे,ज्यांनी या प्रकल्पासाठी पोकलेन मशीन ते जे लागेल ती मदत करणारे डिंग्रजवाडीचे आदर्श मा.सरपंच उद्योजक  राहुल (दादा) गव्हाणे, वृक्ष रोपण कामात सक्रिय श्रमदान करणारे संदिप ढफळ (सर ),अजित रणसींग, प्रविण रणसींग, मंगेश जाधव,प्रकल्पाचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर कुमार साईराज तांबे, जगताप गुरुजी, सुर्यकांत टाकळकर गुरुजी, राजेंद्र तांबे,शिवम परीवाराचे कार्यकर्ते,ज्यांचे वाढदिवस आज त्याठिकाणी वृक्षारोपण करुन साजरे झाले ते डिंग्रजवाडीचे उपसरपंच  दत्ता आबा गव्हाणे, वेदांत रणसींग, रामदास दरेकर सदस्य ग्रामपंचायत सनसवाडी.
    तसेच धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प,बकोरी देवराई वनराई प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांसाठी अहोरात्र मेहनत करणारे वृक्ष मित्र धर्मनाथ बोत्रे, चंद्रकांत वारघडे हे उपस्थित होते.
   आलेल्या सर्व मान्यवरांचे व श्रमदानासाठी आलेल्या सर्व वृक्ष मित्रांचे आभार सुर्यकांत टाकळकर गुरुजी यांनी मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!