शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान जनजागृती करण्यात आली.
हर घर तिरंगा अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेवून कार्यक्रम संपन्न झाला. या अभियानांतर्गत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकविण्यात येणार असून सर्वांनी यामध्ये सहभागी होण्याचे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे आवाहन मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांनी केले आहे.