बुर्केगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

Bharari News
1 minute read
0
सुनील भंडारे पाटील
      बुर्केगाव (तालुका हवेली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव निमित्ताने प्रभातफेरी काढण्यात आली.  
   जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद,  गावातील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता, देशभक्ती, स्वातंत्र्य दिन, याविषयी घोषणा देत, तसेच हातामध्ये तिरंगा, ड्रमच्या आवाजामध्ये संचलन करत, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याविषयी संपूर्ण गावामध्ये लहानग्यांनी जनजागृती केली,
 याप्रसंगी बुर्केगावचे विद्यमान सरपंच .संतोष पवळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष.अजित ठोंबरे,.केशव दाभाडे,गणेश थोरात: गणेश दाभाडे .स्वप्नाली शिंगटे व इतर सदस्य उपस्थित होते, उपस्थितानी  विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याविषयी व हर घर तिरंगा या उपक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे  नियोजन मुख्याध्यापिका व सहकारी शिक्षक वृंद,मदतनीस यांनी केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 23, June 2025