सुनील भंडारे पाटील
शिरूर तालुक्यातील आपटी या गावांमधील एका फार्म हाऊस वर अल्पवयीन बारा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून, शिक्रापूर पोलिसांनी हा गुन्हा करणाऱ्या नराधमास गुन्हे दाखल करून अटक केली आहे,
विशाल दामोदर गायकवाड (वय 21) असे आटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, घटनास्थळी काही कुटुंब शेतकामासाठी आहेत, मुलीचे आई वडील घरी नसताना या युवकाने घराशेजारी जागेत आडोशाला नेऊन तिला दमदाटी करत तिच्यावर बलात्कार केला, घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हा सर्वांना जिवे मारीन, अशी धमकी दिल्याने पीडित मुलगी घाबरली मुलीच्या आईला हा सर्व प्रकार कळल्यानंतर, पीडित मुलीची आई आणि वडील यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे घडला प्रकार सांगून तक्रार दाखल केली, त्यानुसार शिक्रापूर पोलीसनी कारवाई करत, आरोपी विशाल गायकवाड याच्यावर, बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करून तातडीने अटक केली, त्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले, चार दिवसांच्या पोलीस कोठडी मिळाली, घडलेला प्रकार घृणास्पद असून, परिसरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेडगे करीत आहेत,
या घटने बाबतीत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तीव्र स्वरूपाचे शाब्दिक शस्त्र संधान साधले असून, त्यांनी सांगितले की घटनास्थळाचे फार्म हाऊस भाजपच्या एका बड्या नेत्याच्या असून, या फार्म हाऊसची, व त्याचे मालक यांची चर्चा कुठे होऊ नये, यासाठी हे प्रकरण दाबले जाऊ शकते, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की या बारा वर्षाच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, हे प्रकरण तातडीने कोर्टात चालवावे , बदनामी टाळण्यासाठी जर प्रकरण दडपले गेले तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,
फार्म हाऊसचे मालक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मी या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, मी स्वतः आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे, शिवाय पोलिसांना कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे, पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून, गंभीर गुन्हे दाखल केले आहेत, शिवाय न्यायालयात हजर करून, चार दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे, त्यामुळे कारवाईत कुठलेही कसर झाली नाही,