शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याची माहिती मुख्याध्यापक एस.टी.गद्रे यांनी दिली.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील पाच विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्तीस तर दोन विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. एनएनएमएस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- ओंकार संदिपान फड, वैष्णवी माधव धुपे, पार्थ भाऊसाहेब बांगर, संघर्षा सचिन शिंदे, वैभक्ती भरत कांबळे. सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- अस्मिता अरुण भोसले, आदित्य प्रभाकर गांजवे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्रीमुकेश कांबळे यांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम व संचालक मंडळ तसेच विद्याधाम प्रशाला शिक्रापूरचे अध्यक्ष प्रकाश बोरा, मुख्याध्यापक एस. टी.गद्रे, उपमुख्याध्यापक एस. बी.थोरात, पर्यवेक्षक एस. टी. शेळके यांनी अभिनंदन केले.