गुजर प्रशालेच्या सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील सहा विद्यार्थी एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याची माहिती प्रशालेच्या प्राचार्या सुवर्णा चव्हाण यांनी दिली.
 एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील सृष्टी जगताप व स्नेहल केदारी या दोन विद्यार्थिनी  शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. या विद्यार्थिनींना प्रतिवर्षे प्रत्येकी १२ हजार प्रमाणे चार वर्षात प्रत्येकी ४८  हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम व मार्गदर्शक शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन यामुळे हे दैदीप्यमान यश विद्यालयास प्राप्त झाले. प्रशालेतील  गायत्री दाभाडे, सायली मुळे ,प्रज्वल डफळ व शौर्य ढमढेरे या विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती प्रतिवर्षी ९ हजार ६०० रुपयांप्रमाणे चार वर्षात प्रत्येकी ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थिनींना प्रशालेतील रवींद्र सातपुते, सोनाली शेळके, अरुण भगत, अर्चना गोरे व  नंदा सातपुते यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!