शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील वर्तमानपत्र विक्रते झळके दाम्पत्याचे अहमदनगर जवळ अपघाती निधन झाले. अपघाताची बातमी समजताच तळेगाव ढमढेरे परिसरात शोककळा पसरली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील वर्तमानपत्र विक्रते व आयडीबीआय बँकेचे कर्मचारी दत्तात्रय झळके हे सपत्नीक त्यांच्या मुलीच्या गावी कार्यक्रमानिमित्त अहमदनगरला दुचाकीवरून जात असताना आज शुक्रवार (दि.२३ सप्टेंबर) रोजी दुपारच्या दरम्यान अहमदनगर येथील कल्याण फाटा कांदा मार्केट जवळ, टँकरने धडक दिल्याने दत्तात्रय झळके (वय ५१ वर्षे ) व त्यांच्या पत्नी सुवर्णा झळके (वय ४८ वर्षे) या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच तळेगाव ढमढेरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे.