टाकळी हाजी - निमगाव दुडे- मलठण मार्गावरील गतीरोधक हटवा

Bharari News
1 minute read
0
*टाकळी हाजी - निमगाव दुडे- मलठण मार्गावरील गतीरोधक हटवा..*
*जेष्ठ नागरीकांची शिवबा संघटनेकडे तक्रार संघटनेकडून त्वरित दखल.*

शिरूर विशेष प्रतिनिधी
    शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी - निमगाव दुडे- मलठण या मार्गावर नुकतेच प्रशासनाकडुन नियमबाह्य गतीरोधक टाकण्यात आले आहे. ६-७ किलोमीटरवर वर १३-१४ गतिरोधक टाकण्यात आले. या रस्त्यावरून जाताना जेष्ठ नागरीकांना मणक्यांच्या आजार जास्त प्रमाणात जाणवायला लागल्याने नागरिक त्रस्त झालेत. अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वाहन चालकानाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर कुठेही शाळा नाही चौक नाही. मात्र नियमबाह्य गतीरोधक आहे. ते त्वरित काढण्यात यावे  अशी मागणी सरपंच सोमनाथ भाकरे यांनी केली.
गतिरोधक प्रश्नासबंधी तक्रार शिवबा संघटना तालुका प्रमुख तथा सरपंच माळवाडी सोमनाथ भाकरे व सहकार्यानकडे  केली. शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित दखल घेत शिवबा संघटनेच्या वतीने याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर ला देण्यात आले. यावेळी शिवबा संघटना शिरूर तालुका प्रमुख तथा सरपंच सोमनाथ भाकरे ,युवा नेतृत्व माऊली घोडे,उपसरपंच आनंदा भाकरे,युवक तालुका प्रमुख केशव शिंदे,हरीष झंझाड, ग्रा सदस्य राहुल गारुडकर, डॉ दौलत पांढरकर, बाळासाहेब रसाळ, आदिनाथ भाकरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगेश पांढरकर,किरण रासकर,कैलास भाकरे,तुषार भाकरे,राहुल माळवे,आदि सहकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 22, June 2025