आमदाबाद येथून तरुण बेपत्ता - अविनाश पवार

Bharari News
0
शिरूर विशेष प्रतिनिधी
        आमदाबाद (तालुका शिरूर) येथील अविनाश रामचंद्र पवार हा  ४० वर्षीय गरीब कुटुंबातील युवक कुणालाही काहीही कल्पना न देता दिनांक २ सप्टेंबर पासून राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. 
     फोटो .. अविनाश पवार
अविनाश याची पत्नी वैशाली ही सकाळी साडेअकरा वाजता मुलांना शाळेत सोडून तशीच शेतात कामाला गेली तेव्हा तो घरीच होता परंतु साडेपाच वाजता आल्यानंतर पाहिले तेव्हा तो कुठेही दिसला नाही. फोन केला असता मोबाईल घरातच होता. मोबाईल घरी ठेवून तो कुठेतरी जवळपास गेला असेल असे तिला वाटले. परंतु उशीरा त्याचे पाकीट सुध्धा घराजवळच सापडल्याने त्यांना शंका आली. त्यांनी शेजारी, मित्र परिवार,नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली परंतु काहीच तपास लागला नाही. 
              त्याचा मोबाईल तसेच त्याच्या खिशातील ए टी एम कार्ड , लायसन आणि इतर कागदपत्र घरीच ठेवून गेला असल्यामुळे घरातील सदस्यांना त्याचा तपास करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्याची पत्नी  वैशाली हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस नाईक धनंजय थेऊरकर करत आहेत. 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!