शिवबा संघटनेतर्फे हरिहर किल्ल्यावर माळवाडी ग्रामपंचायत शिलेदारांचा सन्मान

Bharari News
1 minute read
0
शिरूर विशेष प्रतिनिधी
         'शिवबा दुर्गसंवर्धन परीवार महाराष्ट्र राज्य'  हि संस्था महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे सवर्धन व स्वच्छता मोहिमांचे नियोजन करत असते. नुकत्याच पार पडलेल्या माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवबा संघटनेचे शिरूर तालुकाप्रमुख सोमनाथ भाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दणदणीत विजय मिळवला.यानिमित्त माळवाडी येथील शिलेदारांचा शिवबा संघटने तर्फे अध्यक्ष अनिल शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हरिहर किल्ल्यावर सन्मान करण्यात आला.
          शिवबा संघटना आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान किल्ल्यावर करत असते .  कारण तो सत्कार ऐतिहासिक असतो.  छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने शिवबा संघटना सामाजिक कार्य करत आहे. ४ तारखेला हरीहर किल्ला नाशिक येथे स्वच्छता मोहीम पार पडली.
            या निमित्ताने माळवाडीचे प्रथम सरपंच सोमनाथ भाकरे,उपसरपंच आनंदा भाकरे, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भाकरे ,राहुल गारुडकर,डॉ दौलत पांढरकर, यांचा  सत्कार समारंभ किल्ल्यावर पार पडला. यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, मोहीम प्रमुख बबन तनपुरे,रोहिदास लामखडे,सुरेश लंके,प्रा. कवडे सर, केशव शिंदे,अरुण लंके,रायचंद गुंड,मेजर अमोल ठुबे,योगेश भाकरे, भिमदास भाकरे, निलेश टिळेकर, राहुल माळवे, बाळासाहेब भंडारी ,संदिप गायकवाड,राजु लंके,तुषार भाकरे, सागर भाकरे,शरद भाकरे, अजित भाकरे आदि उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 18, June 2025