सुनील भंडारे पाटील
वाडेबोल्हाई (तालुका हवेली) येथील पुणे जिल्ह्यातील भाविकांचे जागृत श्रद्धास्थान असलेले धार्मिक स्थळ श्री क्षेत्र बोल्हाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी आज रविवारी गर्दी व रांगेत दर्शन घेतले,
परिसरात भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले या मंदिरात देवीचा वार रविवारी आवर्जून भक्त दर्शनासाठी येत असतात, परंतु सद्यस्थितीत चाललेल्या नवरात्र महोत्सवामुळे लोकांनी देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी केलेली आहे, लोकांना गर्दीमध्ये, तसेच शिस्त पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी श्री बोलाई माता देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत,
दुपारी 12 वाजता श्री बोल्हाई माता देवीचा ओलांडा निघतो याप्रसंगी ओलांड्याचा स्पर्श, दर्शन मिळणे म्हणजे फार मोठे भाग्य समजले जाते, तसेच भक्तांची मनोकामना पूर्ण होते, याचा प्रत्यय पिढ्यान पिढ्या लोकांना अनुभव आहे, या जागृत देवस्थानाचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे, बोल्हाई मातेच्या दर्शनाने अंगावरील त्वचारोग पूर्णपणे बरे होतात, हा अनुभव फार पुरातन काळापासून पिढ्यान पिढ्या लोकांनी घेतलेला आहे, हे देवस्थान पांडवकालीन देवस्थान असून मंदिराचे बांधकाम तटबंदी हे पूर्णपणे पुरातन दगडी बांधकाम हजारो वर्षांपूर्वीचे असल्याचे मंदिर पाहिल्या नंतरच आपल्याला समजते, मंदिरा समोरचा नंदादीप, मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, शिवसृष्टी, प्राचीन पाण्याचे तळे, मंदिर गाभारा, मंदिर परिसर याचे दर्शन घेणे भाग्य समजले जाते,
लोणीकंद पोलीस व शहर पोलीस खात्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पोलीस खात्याचे अधिकारी सह आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी श्री बोल्हाई माता देवस्थानला भेट दिली व दर्शन घेतले, तसेच मंदिर परिसराची पाहणी केली