पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात गोळीबार; २८ लाखांची रोकड लंपास

Bharari News
1 minute read
0
लोणी काळभोर प्रतिनिधी 
    पुण्या मधील मार्केट यार्डातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करुन २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे.    
शनिवारी दुपारच्या सुमारास गोळीबारामुळे मार्केट यार्ड परिसरात घबराट उडाली.मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चोरटे कार्यालयात शिरले. चोरट्यांनी चेहरे कापडाने झाकले होते. चोरट्यांनी अंगडिया यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली.
       कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी चोरट्यांनी गोळीबार केला. कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 22, June 2025