जेष्ठांबरोबर तरुणांना व शालेय छात्रांनाही वारकरी साहीत्य परीषदेच्या प्रवाहात आणुयात - हभप प्रशांत महाराज मोरे

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनिधी
       जेष्ठांबरोबर तरुणांना व शालेय छात्रांनाही वारकरी साहीत्य परीषदेच्या प्रवाहात आणुयात - हभप प्रशांत महाराज मोरे आपण महाराष्ट्र राज्य वारकरी परीषदेच्या कार्यात भविष्य काळात जेष्ठांबरोबर युवापिढी व शालेय छात्रांनाही प्रवाहात आणूयात , असे प्रतिपादन पुणे जिल्हा वारकरी साहित्य परीषदेचे अध्यक्ष तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी राजूरी येथील वारकरी साहीत्य परीषदेत अध्यक्षीय भाषणात केले .
पुणे जिल्हास्तरीय ११ वा वर्धापन दिन व वैष्णव मेळावा राजूरी ता जुन्नर येथील खंडेराय भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट सभागृहात राजूरी व जुन्नर तालुका साहित्य परीषदेतर्फे आयोजीत करणेत आला . वृक्षारोपन व स्वागत गिता नंतर दिपप्रज्वलन, माऊली व तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली . हभप गंगारामबुवा डुंबरे यांनी प्रास्ताविक तर विशाल महाराज हाडवळे व अनंतराव गटकळ यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला . यावेळी माजी आमदार शरद सोनवणे , माजी जि प सदस्य पांडूरंग पवार , मोहीतशेठ ढमाले, मा सभापती दिपक औटी बाळासो औटी , सरपंच प्रियाताई हाडवळे , उप सरपंच ज्ञानेश्वर शेळके , प्रशांत महाराज गावडे व वारकरी सांप्रदायातील महाराष्ट्रातील किर्तन प्रवचनकार व वारकरी उपस्थीत होते .
यावेळी प्रशांत महाराज मोरे , साहित्य परीषदेचे सचिव लक्ष्मण शेरकर , सहसचिव शामराव महाराज गायकवाड , माजी आमदार शरद सोनवणे व मान्यवरांचे हस्ते वारकरी व भजनी मंडळांचा स्मृती चिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करणेत आला .
यावेळी दिपक औटी, शरद लेंडे , बाळासो औटी , लक्ष्मण शेरकर , हभप सविता गवते , डॉ . अनुष्का शिंदे , शरद सोनवणे व पंकज महाराज गावडे यांनी वारकरी साहित्य परीषदे च्या कार्यास शुभेच्छा दिल्या . सूत्रसंचालन डॉक्टर लताताई पाडेकर पुणे जिल्हा सचिव व गणेश मोरबे यांनी केले . आभार गटकळ व औटी यांनी मानले . पसायदानानंतर महाप्रसादाने परीषदेची सांगता झाली,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!