सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
सणसवाडी (ता शिरूर) येथे तरुणाईच्या बरबादीच्या सर्व सोई सुविधा शासन व ग्रामस्थांतर्फे उपलब्ध असून रस्तोरस्ती बेवडे पडलेले , जागोजागी गुटका बहादर थुंकलेले नकाशे दिसतात .
नेते पुढारी इकडे लक्ष देत नाहीत व पोलीस प्रशासनाचे कुठे सगळीकडे लक्ष असणार ? गुटका खाणारे रस्ता चौकात तोंड वर करून पुड्या रिचवतात व कुठेही थुंकतात . ज्याने दाढी वाढविली विविध कार्यक्रमात नाचत होते तेच रस्त्यात नशेत बेभान होऊन पडलेले पाहून कुणाला त्याचे सोयरसुतक नाही,
गावात वर्षाला ४डझनावर किर्तने प्रवचने होतात , काही पुढारी दिखाव्यासाठी सहभागी होतात पण ही सामाजीक समस्या , प्रदुषण , व्यसनामुळे होणारी बरबादी लुटमार रोकण्यासाठी कुणी पुढाकार घेत नाहीत . राळेगण सिद्धी हिवरे बझार आदर्श गावे बनली ते अण्णा हजारे व पोपटराव पवारांनी व्यसनमुक्त गाव केल्याने . पण इथे फक्त पोपटपंछी चालूय समाज कारण नाही . तरी या प्रकरणांवर शासन पुढारी ग्रामस्थ कुणी निराकरणासाठी प्रयत्नरत होतील काय अशी नागरीकांची अपेक्षा आशा आहे .
मुळातच सणसवाडी मध्ये देशी व इंग्रजी दारूची दुकाने बड्या नेत्यांच्या जागेत असल्यामुळे, तसेच पान टपऱ्या गुटख्याची दुकाने देखील याच परिसरात असल्याने नेमकी असल्या उद्योगावर कारवाई करायची कुणी हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे, गावचे वातावरण मात्र बिघडू लागले आहे,
बेवड्याला जाग आणण्यासाठी पहा छायाचित्रांमध्ये ती माता माऊली पाण्याची बादली घेऊन आली आणि तोंडावर पाणी मारत आहे,