वढू बुद्रुक येथील केईएम हॉस्पिटल तर्फे क्षयरोग जनजागृती

Bharari News
1 minute read
0
सुनील भंडारे पाटील
             वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील के ई एम हॉस्पिटल तर्फे परिसरातील गावांमध्ये जनजागृती रॅली काढून क्षयरोग निदान व उपचार याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली,          
  माणसाच्या आरोग्याला धोकादायक असणारा क्षयरोग (टि बी ) या संसर्गजन्य रोगापासून लोकांना वाचवण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल यांच्यातर्फे ग्रामीण भागामध्ये पावले उचलण्यात आली असून या आजाराविषयी लोकांना पूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी परिसरात पाई रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी असंख्य  महिला व पुरुषांनी सहभाग घेतला होता, हातात नाम फलक, आजारासंबंधी माहितीची घोषणाबाजी करत जनजागृती करण्यात आली, 
   यावेळी आयोजकांनी सांगितले की, शासकीय व मान्यता प्राप्त रुग्णांमध्ये टीबीचे निदान व उपचार संपूर्णपणे मोफत करण्यात येतात, क्षय रोगाची निदान करण्याचा एक उत्तम व खात्रीचा मार्ग म्हणजे सूक्ष्मदर्शकाने बेडका नमुना तपासणी, त्यानंतर मोफत व अखंडित उपचार केला जातो, उपचाराचा पूर्ण तपशील ठेवला जातो, आरोग्य कार्यकर्त्याच्या देखरेकीखाली औषध उपचार केले जातात, अधिक माहितीसाठी जिल्हा क्षयरोग केंद्र पुणे ग्रामीण टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800116666 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 21, June 2025