सुनील भंडारे पाटील
सोशल मीडियावर जनसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याकरिता तलवार व कोयत्यासह रिल्स बनवणाऱ्या तिघा जणांवर शिक्रापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर व त्यांचे इतर सहकारी सोशल मीडिया फेसबुक, इंस्टाग्राम याची माहिती घेत असताना आज गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिक्रापूर (तालुका शिरूर) हद्दीमधील महाबळेश्वर नगर मध्ये लोकांच्या दहशत पसरविण्यासाठी सोशल मीडियावर रील बनवण्याकरता तीन मुले हातात कोयता व तलवार घेऊन रस्त्यावर फिरत आहेत, तातडीने सदर ठिकाणी गुन्हे शोध पथक दाखल झाले, दोन मुलांना एक कोयता व एक तलवारी सह ताब्यात घेण्यात आले, एक जण हातातील कोयता टाकून पळून गेला,1) ओमकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार, वय 23 वर्ष, रा. शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे,2) दुर्वांश शिवाजी क्षेत्री वय 23 वर्ष, रा. शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे,3) दिलावर सुभान शेख रा. महाबळेश्वर नगर शिक्रापूर, तालुका शिरूर जिल्हा पुणे या तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे,
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस उपाधीक्षक यशवंत गवारी, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोलीस नाईक मिलिंद देवरे, अमोल नलगे, रोहिदास पारखे, विकास पाटील, शिवाजी चितारे, पोलीस शिपाई जयराज देवकर, निखिल रावडे, किशोर शिवणकर, लखन शिरसकर यांनी केली,
सोशल मीडियावरील रिल्स बनवण्या करिता व जनसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याकरिता जे कोणी सोशल मीडियाचा गैरवापर करीत आहेत त्यांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला दिलेले आहेत,
"पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल "