रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
राजकारणात महिलांना काम करण्याची संधी मिळावी म्हणुन आरक्षण व कायदे करण्यात आले माञ या कायद्याला व आरक्षणाला हरताळ फासण्याचे काम लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाकडुन केले जात आहे. सरपंच असलेल्या महिलेचा पतीच कारभार हाकत असल्याचे सर्वञ पाहावयास मिळत आहेत.
अधिकारी ही त्यांना साथ देत असतात. एवढेच नाही तर कधी कधी महिला सरपंचाच्या सह्या ही त्यांच्या पतीराजाकडून च " हाणल्या " जातात. कारण त्या बदाल्यात त्यांना तेवढा मान सन्मान मिळत असतो. पत्नी सरपंच असताना ही हा " टग्या " स्वतः सरपंच म्हणून फिरत असतो. व मान सन्मान मिळवत आसतो.
माञ सध्या शिरुर तालुक्यात या ही पुढचे एक पाऊल टाकले गेले आहे. चिंचोली मोराची येथे शनिवार दि.५ आँगस्ट रोजी पालकमंञी चंद्रकांत पाटील , सहकारमंञी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत एका विकासकामाचे भुमीपुजन होणार आहे. या कार्यक्रमाची कार्यक्रम पञिका ही छापण्यात आली आहे. माञ या कार्यक्रम पञिकेमध्ये आयोजकांनी परिसरातील गावांमधील महिला सरपंचांऐवजी त्यांच्या पतींचांच सरपंच म्हणुन नामोल्लेख केला आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व आयोजकांकडून महिलांना काम करण्याची संधी मिळावी म्हणुन जे आरक्षण व कायदे करण्यात आले त्या कायद्याला व आरक्षणाला हरताळ फासण्याचे काम केले गेले आहे. त्यामुळे आता सहकारमंञी दिलीप वळसे पाटील यांनीच या गोष्टीत लक्ष घालून महिला सरपंचाना त्यांचा मान सन्मान उपलब्ध करुन द्यावा.