शरीर वाढल्यावर व्यायामाने व धन वाढल्यावर दानाने कमी करावे लागते - ह भ प बाजीराव महाराज काशीद

Bharari News
1 minute read
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
          एखादे धरण तलाव पाण्याने फुल भरून ओव्हरफ्लो झाल्यावर सांडे वाटे ,दरवाजावाटे पाणी सोडावे लागते ,तसे शरीर वाढल्यावर व्यायाम प्राणायाम व परिश्रमाने कमी करावे लागते , असे प्रतिपादन सणसवाडी येथील अधिक मासानिमित्त आयोजित कीर्तन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ह भ प बाजीराव महाराज काशीद यांनी केले .     
   त्यांना उत्कृष्ट गायन साथ गायक रामनाथ सालपे ,गोपाल महाराज समिंदर , रवी डाके व ह भ प राजेंद्र गरुड यांनी दिली . हार्मोनियम विकास महाराज जाधव तर मृदुंग वादन येवले यांनी केली  .' तुकाराम तुकाराम ! नाम घेता कापे यम 'या अभंगावर बोलताना महाराजांनी तुकाराम महाराजांचे संपूर्ण चरित्र भावीकांसमोर मांडले . प्रवचन सेवा हरिभक्त परायण कैलास अण्णा हरगुडे यांची झाली .रात्री भजनाचा जागर डिंग्रजवाडी, सणसवाडी ,दरेकरवाडी भजनी मंडळाचा झाला . यानंतर ह भ प विलास महाराज गेजगे,ह भ प विशाल महाराज खोले , (मुक्ताईनगर ) ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (आळंदी देवाची ) ह भ प शिवाजी महाराज वाघ ,देहू यांचे काल्याचे किर्तन आयोजित आह,    
 अशा या सर्व टीव्ही फ्रेम कीर्तनकारांच्या ज्ञानदानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सणसवाडी ग्रामस्थांनी केले आहे . उद्या प्रवचन सेवा ह भ प राजेंद्र महाराज गरुड ,ह भ प नारायण महाराज ससे यांची होणार आहे . मंगळवारी भैरवनाथ प्रसादिक दिंडी व ग्रामस्थांतर्फे तुकाराम महाराज पालखी सोहळा मिरवणुकीचे आयोजन आहे ,तरी त्यातही सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सप्ताह मंडळाचे अध्यक्ष काळूराम हरगुडे ,उपाध्यक्ष निवृत्ती सोनबा हरगुडे, मोहन हरगुडे , रामदास हरगुडे यांनी केले आहे . महाराजांचा सत्कार दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे यांचे हस्ते करण्यात आला . श्री ज्ञानेश्वरी पारायणाने सकाळी सप्ताहाची सुरुवात झाली ह भ प बाळासाहेब चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 22, June 2025