सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली) येथे अनेक वर्षांपासून चाललेल्या अनेक खडी क्रशर मशीन क्रशरचा ग्रामस्थांना तसेच नागरिकांना खूप त्रास होत असून ग्रामपंचायतनि दिलेल्या सूचनांचे देखील खडी क्रेशर मालकांकडून उल्लंघन होताना दिसत आहे, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ठरवून दिलेल्या लेखी स्वरुपात नियमांना सरळ केराची टोपली दाखवली जात आहे,
वीस वर्षांपासून चाललेल्या खडी क्रशर यंत्रणेने लोणीकंद पासून पश्चिमेला भावडी पर्यंत तसेच भावडी पासून वाघोली पर्यंत शेकडो एकर जमीन काबीज केली आहे, 24 तास चाललेल्या या यंत्रांमुळे आसपासच्या गावांना सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोणीकंद गावाला धुळीचा खूप त्रास होत आहे, धूळ खाद्यपदार्थांमध्ये मिसळत आहे, लोकांना खोकला व श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे, राजरोसपणे अवैध खडी वाहतुकीचे डंपर रस्त्यावर आल्याने लहान मोठे अपघात होत आहेत, यात कित्येकांचे प्राण गेलेत,
या सर्व संकटातून सुटका होण्यासाठी लोणीकंद ग्रामपंचायतीच्या वतीने खडी क्रशर मालकांना ठराव करून लेखी नोटीस द्वारे सूचना दिले आहेत,1) सकाळी 6:00 ते सायंकाळी 6:00 पर्यंत डंपर वाहतूक करावी,2) सायंकाळी 6:00 ते सकाळी 6:00 पर्यंत वाहतूक बंद असेल 3) अंतर्गत धूळमय रस्त्यावर पाणी मारावे 4) अंतर्गत रस्त्यावर डांबर टाकावे, अशा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असताना यामधील एकाही सूचनेचे पालन खडी क्रशर मालकांकडून केले जात नाही, त्यांना कुठल्याच प्रकारची भीती वाटत नाही, याचा अर्थ या सर्व गोष्टींना पाठिंबा देणारी कोणीतरी मोठी व्यक्ती आहे अशी चर्चा समाजात चालू आहे, खडी क्रशर मालकांनी ग्रामपंचायत नियम पायदळी तुडवून अपमान केला असून सूचना दिलेल्या नोटीसला सरळ केराची टोपली दाखवली आहे,