आमदार अशोक (बाप्पू) पवार यांचा पाठपुराव्याला यश; लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालय मंजूर

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
        हवेली तालुक्या मधील लोणी काळभोर येथे,अत्यंत गरज असणाऱ्या शासकीय कामासाठी  अप्पर तहसीलदार कार्यालयाची मंजुरी..
      शेतकरी,तसेच सर्व सामान्य लोकांना अप्पर तहसील कार्यालय हवे होते. या मागणी साठी शिरूर हवेलीचे आमदार सातत्याने पाठपुरावा करत होते.अप्पर तहसील कार्यालयासाठी कार्यालय करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होईल असे मत आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.याबाबत (सनी उर्फ युगंधर काळभोर उप सभापती पं.स. हवेली) यांनी सामान्य जनतेला व परिसरातील गावांना याचा लाभ होणार असून हि आनंदाची बाब आहे .असे ते यावेळी बोलत होते.

         पुणे शहराला लागून हवेली तालुक्यात झपाट्याने नागरिकरण झाले असुन दररोजच्या वाढत्या व्यापामुळे अपर तहसील कार्यालय असावे अशी मागणी २०१५ पासून होत होती. अपर तहसीलदार कार्यालय होणार असल्यामुळे हवेली तहसीलदार कार्यालयावर येणारा कामाचा बोजा कमी होऊन कामे लवकर होतील. या संदर्भात शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले की पावसाळी अधिवेशनात कपात सूचनेच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता. या आशयाचे एक निवेदन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले होते. हवेली तालुक्याची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण २४,३२,५५१ इतकी आहे. दिवसेंदिवस या लोकसंख्येत मोठी भर पडत आहे.

         एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या हवेली तालुक्याचे कामकाज एकाच तहसिलदारा मार्फत चालविणे योग्य नाही. त्यामुळे महसूल खात्याशी सबंधित अनेक नागरिकांची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत. त्यामुळे अप्पर तहसीलदार कार्यालय तातडीने करावे अशी मागणी अशोक पवार यांनी केली होती. लोणी काळभोर अपर तहसीलदार कार्यक्षेत्रात वाघोली, उरुळी कांचन व थेऊर ही महसुली मंडळे येणार असुन यामध्ये एकुण ४४महसुली गावांचा समावेश आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!