रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून समर्थ पोलीस ठाणे( पुणे) तपास पथकाने पिस्टल केला जप्त

Bharari News
0
पुणे प्रतिनिधी सुनिल सांबारे 
       समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस उप निरीक्षक थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे सिद्दीक खान याचेकडे पिस्टल असुन तो रात्री ०१/०० वा. चे सुमारास समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या सोमवार पेठ पोलीस चौकी शेजारील समर्थ व्यायाम मंदिरासमोर सोमवारपेठ येथे त्याचे मित्रास भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती तात्काळ त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर समर्थ पोलीस ठाणे यांना दिली.
      त्यावरुन त्यांनी पोलीस उप निरीक्षक थोरवे यांना स्टाफसह सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेशित
केले. सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक थोरवे, पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड, सहा. पोलीस फौजदार दत्तात्रय भोसले, पोलीस हवालदार प्रमोद जगताप, पोलीस हवालदार गणेश वायकर व पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांनी जावुन सापळा रचला असता रात्री ०१/३५ वा. चे सुमारास इसम नामे सिध्दीक खान हा समर्थ व्यायाम शाळेसमोर त्याचे मित्रास भेटण्यास आला होता, त्यावेळेस त्यास स्टाफच्या
मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. २३, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे असे सांगितले. त्याची अंग झडती
घेतली असता त्याच्या उजव्या बाजुच्या कमरेस पॅन्टच्या आतमध्ये खोचलेला १ स्टिलचे पिस्टल मॅग्झीनसह मिळुन आले, तसेच पॅन्टच्या उजव्या खिशात गावठी पिस्टलचे १ काडतुस मिळुन आले.त्याचेकडून एकुण १०,२००/- रु.चा पिस्टल व काडतुस जप्त करून समर्थ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२६३/२०२३ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम
३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर या पूर्वी एकशरिराविरुद्धचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,
पुणे शहर, मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - १ पुणे शहर, अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुंक्त, फरासखाना विभाग, पुणे सुरज बंडगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीसउपनिरीक्षक सुनिल रणदिवे, पोलीस उप निरीक्षक सौरभ थारवे, पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड,पोलीस उपनिरीक्षक दिपक यादव व कर्मचारी सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, पोलीस हवालदार प्रमोद जगताप, पोलीस हवालदार गणेश वायकर, पोलीस हवालदार संतोष डमाले, पोलीस
हवालदार रोहीदास वाघेरे, पोलीस नाईक रहीम शेख, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, पोलीस अंमलदार
अमोल शिंदे म.पोलीस अंमलदार वैशाली परदेशी, म.पोलीस अंमलदार रागिनी शिंदे यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!