माहेर, वढु बु. (तालुका शिरूर) येथे एक शांततामय आणि सर्वसमावेशक असा माहेर संस्थे मधील अनाथ मुलांच्या राहण्यासाठीच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला,
जो संस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. सर्व जाती धर्माच्या पद्धती नुसार (बौद्ध- सुशील पोहेकर ,ख्रिश्चन- पास्टर शेशी गोरे ,हिंदू -मधुसूदन शिंदे आणि मुस्लिम मौलाना - इनामदार)या धर्मगुरूंनी कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रार्थना व आशीर्वाद दिले. हा एकतेचा आणि सौहार्दाचा सुंदर नमुना पाहायला मिळाला
समारंभाच्या वेळी रतन राठी, रेखा राठी , कृष्णकुमारजि राठी, प्रशंसा जाधव, उपस्थित होते यावेळी राठी कुटुंबाचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी मनापासून माहेर संस्थेच्या कार्यविषयी स्तुती सुमने वाहिली व कौतुक केले आणि सि.लुसी कुरियन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची व अखंड सेवाभावाची प्रशंसा केली.
हा कार्यक्रम माहेरच्या आंतरधर्मीय सौहार्द, कृतज्ञता आणि सामूहिक भावनेच्या बांधिलकीचे प्रतीक ठरला. या कार्यक्रमाला माहेर संस्था संचलिका सि. लुसी कुरियन ऊर्फ दिदी ,अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, सहसंचालिका शर्ली अँथनी, रमेश दुतोंडे, रमेश चौधरी, प्रकाश कोठावाले, योगेश भोर, मंगेश पोळ, रॉबर्ट, शिलानंद अंभोरे, सुशील पोहेकर, शशिकांत सकट, विनायक गाडे, तेजस्विनी पवार,अथीना नायर,अँजेलिना नेल्सन आणि नेहा पोहेकर,समीक्षा मुळे उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश पोळ यांनी केले