लोणीकंद (तालुका हवेली) येथील सुरभी चौकात तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या तीन बारा सदस्यीय पथकाने अवैध वाहतूक दारांवर धडाकेबाज कारवाई केली आहे. सोळा वाहनांची तपासणी केली असता फक्त सात वाहनचालकांकडे वाहतूक पास आढळले. उर्वरित वाहनचालकांनी नियम मोडले होते.
या कारवाईदरम्यान एका ड्रायव्हरांनी अधिकाऱ्यांच्या समोरून गाडी आतून पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र, पथकाने तत्काळ त्याचे फोटो व्हिडिओ काढत ती गाडी ताब्यात घेतली. तहसीलदार तृप्ती कोलते यांनी स्वतः भाग घेतून स्पष्ट केले की, “नियमभंग करणाऱ्यांना आता माफ नाही.”
तहसीलदारांच्या आगमनाची माहिती मिळताच अनेक डंपर चालक आणि मालकांची पळापळ झाली, डंपर गायब झाले. परिसरात अचानक भयानक शांतता पसरली आहे.
अवैध वाहतुकीच्या उपरोधकांवर आता कठोर कारवाईची वेळ आली आहे, असा संदेश प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत सातत्य राखून पुढील काळातही नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध शिस्तबद्ध कारवाई होणार आहे.
“कोणालाही नियम मोडण्याची मुभा नाही, नियम मोडणाऱ्यांना शासनाच्या कायद्याचा धाक चालेल असा इशाराच आजच्या कारवाईतून तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिला आहे.