पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मसोबाचीवाडी हे गाव कायम दुष्काळी म्हणून ओळखले जाते तसेच येथे वाड्या वस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती पशुधन असल्याकारणाने तसेच त्यांना पाणी हे मोठ्या प्रमाणात लागत असल्यामुळे, उन्हाळ्याची दाहकता ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील असलेल्या विहीर आणि बोरच्या पाण्याची पातळी खालवल्या कारणाने,
दि. 14 एप्रिलला "म्हसोबाचीवाडीमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर , पशुधन वाचवण्यासाठी ग्रामस्थांची धडपड " या मथळ्याखाली भरारी न्यूज या प्रसार माध्यमाला बातमी लावून सदरील गोष्टीचा पाठपुरावा इंदापूर पंचायत समितीचे बिडीओ सचिन खुडे यांच्याकडे गावचे सरपंच राजेंद्र राऊत ग्रामविकास अधिकारी सोनाली गवळी तसेच भरारी न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी संजयजी चांदगुडे यांनी केल्यानंतर काल दि. 22 मे रोजी पिण्याच्या पाण्याचा टँकरची पहिली खेप ही दाभाडे वस्ती येथील ग्रामस्थांना देण्यात आलेली आहे.
तसेच आज दिनांक 23 मे रोजी दुसरी पिण्याच्या पाण्याची टँकरची खेप थोरल्या विहिरीमध्ये टाकण्यात येणार आहे तसेच तिसरी पिण्याच्या पाण्याची टँकरची खेप ही कवडे वस्ती वरती टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील पिण्याच पाण्याचा प्रश्न हा काही अंशी कमी होणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याकारणाने तसेच पिण्याचा पाण्याचा टँकर चालू झाल्यामुळे वाडयावस्त्यांवरील ग्रामस्थांनी इंदापूर पंचायत समितीचे बिडीओ सचिन खुडे व म्हसोबाचीवाडीचे सरपंच राजेंद्र राऊत तसेच म्हसोबाचीवाडीच्या ग्रामविकास अधिकारी सोनाली गवळी यांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे म्हसोबाची वाडी गावामधील पाण्याचा प्रश्न याविषयीचे वृत्तांकन भरारी न्यूज ने सातत्याने समाजापर्यंत असेच शासनापर्यंत पोहोचवले यामुळे येथील नागरिकांचा पाण्याचा महत्वाचा प्रश्न आणि उन्हाळ्यात सुटल्याने सर्वांनी भरारी न्यूजचे आभार मानले,