सुनील भंडारे पाटील
शिरूर, हवेली व खेड मध्ये महत्त्वाची समजली जाणारी भीमा नदी स्वच्छ करण्याची गरज, आसपासच्या गावांनी, स्वच्छतेसाठी पाऊल उचलण्याची वेळ, काठावरील गाव ग्रामपंचायतींनी सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी,
संबंधित तीन तालुके तसेच पुढे अनेक तालुक्यांमध्ये भीमा नदी काठावरील व आसपासच्या गावांमधील शेती क्षेत्र, रहदारी, हे पूर्णपणे भीमा नदी पात्रातील पाण्यावर अवलंबून असून हे महत्त्वाचे जलश्रोत्र समजले जाते, परंतु भीमा नदी मधील पाणी अतिशय प्रदूषित झाले असून त्यावर हिरव्या जलपर्नी ( कांजवन ) चा थर तयार झाला आहे, त्याचा परिणाम शेती, ग्रामपंचायत पाणी योजना, मासे व इतर जलचर प्राणी यावर झाला आहे, त्यामुळे नदी स्वच्छ ठेवण्याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे, नदीकाठावरील आळंदी पासून पुढे, मरकळ, तुळापूर, फुलगाव, वढु खुर्द, आपटी, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा, पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, नाव्ही सांडस, डिंग्रजवाडी, धानोरी तसेच अनेक गावांमधील सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते, त्याचप्रमाणे संबंधित गावांमधील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील रसायन, ऑइल मिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जाते, त्यामुळे पाणी प्रदूषण खूपच वाढले आहे, संबंधित गावांमधील ग्रामपंचायतींनी, व कंपन्यांनी प्रदूषित पाणी जागेवरच विल्हेवाट लावावी, प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडू नये, ही काळजी घेण्याची गरज आहे,
**** कोरेगाव भीमा चे सरपंच अमोल गव्हाणे यांनी सांगितले की आळंदी पासून पुढे भीमा नदी काठावरील गाव ग्रामपंचायती, कारखाने हे सांडपाणी, रसायनमिश्रीत, ऑइल मिश्रित पाणी नदीमध्ये सोडत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे याचे दुष्परिणाम होत आहेत, संबंधित काठावरील गाव ग्रामपंचायत, कारखान्यांनी दूषित पाण्याची विल्हेवाट जागेवरच लावावी, आम्ही सध्या भीमा नदी शुद्धीकरणासाठी पावले उचलली आहेत *****