श्री सत्यसाई सेवा संघटना पुणे ,साई नेत्रालय पुणे यांच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबिर ,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व मोफत औषध उपचार शिबिर श्री सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र फुलगाव तालुका हवेली येथे आयोजित करण्यात आले आहे,
शनिवार दिनांक 17/05/2025 रोजी सकाळी 9 ते 12:30 या वेळेस संपन्न होणार आहे , श्री सत्य साई सेवा संघटनेच्या वतीने फुलगाव येथे लोकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात, याचा खूप मोठा फायदा नागरिकांना होतो,
या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा फायदा पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा अशी विनंती तसेच सत्य साई संघटनेचे प्रतिनिधी तसेच फुलगाव चे माजी सरपंच सुनील वागस्कर यांनी माहिती दिली आहे,