शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक (तालुका शिरूर) या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 24-25 मधील शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ शंकरराव चव्हाण यांनी दिली .
यावर्षी दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 121 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयात व गावात आनंदाचे वातावरण आहे .
उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 37 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत , 36 विद्यार्थी प्रथम श्रेणीत , 31 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ,तर 17 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या या उत्कृष्ट यशात शिक्षकांचे वर्षभरातील सुसूत्र नियोजन , पालकांनी व विद्यार्थ्यांनी घेतलेले अथक परिश्रम , व श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शन लाभल्याने निकालाची परंपरा राखण्यात विद्यालयास यश आले आहे
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक १) कुमारी प्रणिती संतोष भोगे 93.40 ,२) कुमारी निकिता अशोक शिवले 92.80 ,३) कुमारी वेदिका मोहन कोठावळे 90.40 ,४) कुमारी तेजश्री नथू पाटील 90.20 ,५) कुमार रोहन राहुल आहेर सदर यशाबद्दल विद्यार्थ्यांचे ,सर्व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी केले. एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा , क्रीडा स्पर्धा या सर्वांगीण यशाबद्दलही शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.