शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
जातेगांव बुद्रुक येथील श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयातील संगणकक्षास्त्र विद्याशाखेतील विद्यार्थी प्रज्वल उत्तम जगताप याने गोवा राज्यामध्ये खेलो इंडिया मार्फत सेंट जोसेफ स्कुल मध्ये आयोजित केलेल्या नॅशनल युथ फेडरेशन मध्ये ४०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.
निमोने (ता. शिरूर) येथील प्रज्वल जगताप या खेळाडूचे त्याने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुंगधराव उमाप, सचिव प्रकाश पवार, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, संस्था मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. इंगवले, कनिष्ठ महाविद्यालययाचे प्राचार्य रामदास थिटे, समन्वयक गजानन पाठक, कार्यालय अधीक्षक आनंदा अंकुश, क्रीडा शिक्षण संचालक प्रा. कांतीलाल धुमाळ, प्रा.डॉ.विजय गायकवाड, प्रा. प्रीती पवार, प्रा. पूजा काटे, प्रा. सिमा बांगर, प्रा. सोनाली आव्हाळे, प्रा. रोहिणी जऱ्हाड, प्रा. मेधा गरुड, प्रा. अश्विनी खेडकर, प्रा. अमोल धापटे यांनी अभिनंदन केले. निमोने सारख्या खेडे गावातून आलेल्या या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण शिरूर तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.