हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
पालखीचा थाट अन् भक्तीची वाट साधत जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम
महाराजांच्या पालखीचे कुंजीरवाडी बोरकर वस्ती या ठिकाणी डी. आय. सी. सी.
आय . या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे स्वागत करण्यात आले
दिंडीतील
सहभागी भाविकांसाठी पुणे सोलापूर मुख्य रस्त्यावर कुंजीरवाडी येथे
चहापानाची व फराळ वाटप (डीक्की)दलित इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड
इंडस्ट्रिज पूणे विभागाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. तसेच
सोमेश्वर मिसळ भेळ या हॉटेलचे मालक महादेव खंडागळे परिवाराच्या वतीनेही
हजारो भाविकांसाठी रस्त्याच्या दुतर्फा फराळ व चहाची व्यवस्था (डीक्की)
च्या वतीने करण्यात आली .जिजाऊ मंगल कार्यालय विजय बोरकर यांच्या वतीने १२
दिंड्या यांच्यासाठी मोफत राहण्याची सोय करण्यात आली होती. वारकरी
वेषातील विद्यार्थी व सजवलेली पालखी यांनी दिंडी गाजली. विठ्ठल आरतीने
दिंडी निघाली. विद्यार्थांनी पावली, अभंग, फुगडी खेळत आणि टाळ- मृदंगाच्या
गजरात फेर धरला होता त्यामुळे भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचे स्वागत
करण्यात आले.यावेळी उपस्थित पुणे डीक्की समन्वयक, एवरेस्ट स्पन पाईप मालक
अविनाश जगताप , सातारा डिस्ट्रिक समन्वयक प्रसन्न भिसे,त्यांच्या पत्नी
अर्चना भिसे, युवा उद्योजक श्रीनिवास वाघ , युवा उद्योजक निलेश धुमाळ ,
अखिल भारतीय मराठा सेवा संघ गजानन जगताप हे उपस्थित होते . या वारकरी
सेवेसाठी आलम पठाण ,रविराज काळे,पवन कसबे यांनी परिश्रम घेतले.