शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका आमदार पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
            राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्रापूर ग्रामपंचायतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनविलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे उदघाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
           

शिक्रापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन करताना आमदार अशोक पवार.(छाया : नमीरा डिजीटल)
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आयोजीत या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे, तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे देखिल अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले की आपल्या शिरूर तालुक्यातील अनेकजण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवेत आहेत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. प्रशासकीय सेवेत आपल्या तालुक्यातील मुलांचा टक्का वाढावा यासाठी मार्गदर्शन करणारी केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. शिक्रापूर ग्रा.पं. ने अशी अभ्यासिका सुरू करण्यात जो पुढाकार घेतला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. तालुक्यात अशा अभ्यासिका सुरू करण्यासाठी आपण  स्वतः आता पुढाकार घेणार असून, आमदार निधीतून या अभ्यासिकांसाठी मदत केली जाईल. शिक्रापूर ग्रामपंचायतने अनेक विधायक कामे केली असल्याने या गावाच्या विकासकामांसाठी मी नेहमी झुकते माप दिले आहे. नजीकच्या काळात शिक्रापूरसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही आमदार अशोक पवार यांनी यावेळी दिली. शिक्रापूरची वाढती गरज पाहता शाळांमधील नवीन वर्गखोल्या तयार करण्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासनही यावेळी बोलताना आमदार पवार यांनी दिले. याप्रसंगी नगरच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी विरोळे, निवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुण सोंडे, निवृत्त पोलिस अधीक्षक अरुण जगताप, आयपीएस विनायक भोसले, ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. उपसरपंच मयूर करंजे यांनी वडील स्वर्गीय खंडेराव करंजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहा हजार रुपयाची पुस्तके अभ्यासिकेस देण्याचे या कार्यक्रमात जाहीर केले.शिक्रापूर ग्रामपंचायतीच्‍या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमास शिक्रापूरचे माजी सरपंच आबासाहेब करंजे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, विशाल खरपुडे, कृष्णा सासवडे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, मोहिनी मांढरे, शालन राऊत, उषा राऊत, बाबासाहेब सासवडे, सोसायटीचे चेअरमन दत्ता मांढरे,  मोहन विरोळे, सोमनाथ भुजबळ, काकासाहेब चव्हाण, रवींद्र पाटील,बाबा चव्हाण, राजेंद्र मांढरे, गणेश चव्हाण, विजय काळे, अमर करंजे तसेच विद्याधाम प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मयूर करंजे यांनी केले.  माजी उपसरपंच सुभाष खैरे यांनी सूत्रसंचालन केले तर  ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांनी आभार मानले.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!