हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
"निर्धार नियमित योगा करण्याचाआजपासूनच जपामंत्र निरोगी आयुष्य जगण्याचा"
आज दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सुंदरबाई मराठे विद्यालय प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नियमित योगा करून तो सतत चालू ठेवावा ,योगाची माहिती व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी विशेष योगगुरू डॉ. रबीना खान,योगशिक्षिका सौ नेहा गायकवाड तसेच विशेष जिम प्रशिक्षक पायल अग्रवाल यांना पाचारण करण्यात आले. या विशेष प्रशिक्षकांनी शरीराचे विविध व्यायाम प्रकार व हालचाली, डोळ्यांचे व्यायाम ,हास्ययोगा, टाळ्यांचे प्रकार व प्राणायाम करून घेतले व त्याचे महत्त्व ही विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी विती फाउंडेशन खजिनदार सौ कांहोपत्रा गायकवाड व विती फाउंडेशन अध्यक्ष व सकाळच्या पत्रकार सुषमा पाटील उपस्थित होत्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.योग हि एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे त्याचा अवलंब करून तुम्ही आयुष्यभर निरोगी व आजारापासून मुक्त राहा. योग केल्याने शरीर निरोगी राहते.
शालेय समिती अध्यक्षा प्रा. अलका पाटील म्हणाल्या, की आजच्या युगात आधुनिक जीवनशैली जगण्या बरोबरच आपण स्वतःच्या आरोग्याची ही विशेष काळजी घेतली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी योग आणि व्यायाम करत राहिले पाहिजे. विद्यालयाचे मुख्याध्यापक डाळींबकर यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून सर्वांना योग दिनाच्या व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
*"योग आहे आरोग्यासाठी क्रांती, नियमित योगा करून जीवनात आणू सुख शांती"* अशा घोषणा देत विद्यार्थी आनंदाने वर्गात गेले.