दुचाकी चोरी करणाऱ्या नगरच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

Bharari News
1 minute read
0
लोणीकंद :  पोलीस स्टेशन हद्दीतील तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस पुणे-नगर महामार्गावरील लोणीकंद, येरवडा, चंदननगर, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या अहमदनगर येथील टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.


      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरून नेल्याप्रकरणी दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी निघोज येथून प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे यास ताब्यात घेतले. त्याच्यावर अहमदनगर येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे, गणेश फक्कड कारखिले, आदिल मुख्तार अहमद कुरेशी (तिघेही रा. पारनेर) याच्या पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा तसेच हिंगोली, औरंगाबाद, नाशिक येथील एकूण ४५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीने पुणे-नगर महामार्गावर सर्वाधिक दुचाकी चोरल्या आहेत. सदर कारवाई आळेफाटा पोलिसांनी केली आहे.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 19, June 2025