दत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी श्री विलास जाधव व व्हाइस चेअरमन पदी सौ शारदा वारघडे यांची बिनविरोध निवड.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागलेल्या बकोरी येथील दत्तकृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत वारघडे यांचे जवळचे सहकारी विलास जाधव व व्हाईस चेअरमन पदी सौ शारदा तुळशीराम वारघडे यांची बिनविरोध निवड झाली दत्तकृपा सहकारी पॅनेल ने समोरील विरोधाकाना धक्का देत ११/० ने विजय हस्तगत केला होता त्यामध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या आज संस्थेच्या वाघोली येथील कार्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक पार पडली त्याठिकाणी चेअरमन पदासाठी विलास जाधव व व्हाइस चेअरमन पदा साठी सौ शारदा वारघडे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजय माळवदकर यांनी दोन्हीही पदाधिकारी यांची बिनविरोध निवड जाहीर केली संस्थेचे सचीव दिनकर दहीफळे व निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजय माळवदकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत वारघडे, प्रकाश कुटे, सर्जेराव कुटे,ऊत्तम बापू वारघडे, राजेंद्र वारघडे,बाप्पुसाहेब कांबळे , रामराव कुटे , विकास जाधव ,सागर कुटे,राजेन कुटे,पै कीसनराव शितकल,कीसन टुले , पांडुरंग वारघडे , योगेश वारघडे,दिपक जाधव यांनी प्रयत्न केले व त्याला यश आले.
निवडणूकी आगोदर विलास जाधव यांना चेअरमन पदाचा मी शब्द दिला होता त्यासाठी अनेकांचा विरोध झाला दोन गट झाले , घोडेबाजाराचा प्रयत्न झाला परंतु संस्थेचे आठ संचालक ठामपणे माझ्या पाठीशी ऊभे राहिले त्यामुळे मला दिलेला शब्द पाळता आला असे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.