वाघोलीतील फुलमळा येथे श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी व हनुमान मंदिरांचा जीर्णोद्धार वाघोली-भावडी रोड येथील फुलमळा येथे श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी व हनुमान मंदिर जीर्णोद्धार, प्राण प्रतिष्ठापणा व कलश रोहन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी आयोजित कार्यक्रमात सहभाग घेऊन मंदिरात दर्शन घेतले.
श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी व हनुमान मंदिराचे प्राण प्रतिष्ठापणा व कलश रोहन समारंभ श्रीनिवास कर्डेकर व हभप चौधरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी होमहवन व कलशरोहन समारंभ पार पडला त्यानंतर भजन व हरिपाठ जागर झाले. सायंकाळी कीर्तनकार हभप सोपान महाराज सानप (शास्त्री) यांचे कीर्तन पार पडले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नागरिकांची रेलचेल होती. सुनील चाचा जाधवराव यांच्या संकल्पनेतून मंदिरांचे जीर्णोद्धार करण्यात आले आहे.