गुजर प्रशालेत पालखी सोहळा उत्साहात साजरा

Bharari News
0

शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला

             तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.          
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील गुजर प्रशालेत आयोजित या पालखी सोहळ्यात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या तसेच विठ्ठल व रुक्माई यांच्या वेशभूषा परिधान केल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अभंग व भजन यांचे सादरीकरण उत्तम प्रकारे केले. तसेच गावातूनही प्रभात फेरी काढण्यात आली. ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे, तुळशी वृंदावन व विठ्ठलाची व रुक्मिणीची मूर्ती आणून वारीची शोभा वाढविली.  विठ्ठलाच्या नाम गजरात तसेच अभंग व गाण्यात नृत्य करून विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद मनमुरादपणे लुटला. शिरूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती आरतीताई भुजबळ यांनी क्रांतिवीर तरुण मंडळातर्फे प्रशालेतील वारकऱ्यांचा सत्कार केला. तसेच तळेगाव ढमढेरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नवींद्र जगताप, हभप सूर्यकांत जगताप, संतोष सातपुते यांनी प्रातिनिधिक स्वरूपात दिंडीतील बाल वारकऱ्यांचा तळेगाव ढमढेरे येथील मारुती मंदिरात सत्कार  केला.                 
प्रशालेत तळेगावातील काही दानशूर व्यक्तींनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. शिक्रापूर येथील यश हॉस्पिटलचे  डॉक्टर चंद्रकांत केदारी, उमेश दरवडे, मनोज अल्हाट तसेच पुणे मार्केट यार्डतील व्यापारी दासराव पाटील, भालचंद्र जगदाळे, हन्नुरे सेठ, यशवंत कोंडे, भास्कर लवटे, बल्लूशेठ भोसले बडदेशेठ व सोनू ढमढेरे यांनी सुमारे ६६ डझन वह्यांचे प्रशालेतील विद्यार्थ्यांना वाटप केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, माऊली आल्हाट,   प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!