लोणी काळभोर अनिकेत मुळीक
थेऊर मध्ये सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता,दगडाने ठेचून खून केल्यामुळे चेहऱ्याची देखील ओहळख पडत नव्हती.चौकशी केली असता,तो मृतदेह थेऊर येथील हि नाही .यामुळे पोलिसांना हि मोठे आव्हान समोर आले होते. अनोळखी महिलेच्या मृतदेहाची कोणतीही माहिती मिळत नव्हती. अखेर पुणे पोलिांकडून (लोणी काळभोर) पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये दि.०५ जुलै 2022 रोजी थेऊर यशवंत कारखान्याचा पडीक जागेत एक अनोळखी महिला वय 20 ते 25 सदर घटणा पाहणी केली असता .महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे निष्पन्न झाले.या बाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशमध्ये मध्ये भा. द.वि.कलम ३०२,२०१,प्रमाणे गुन्हा नोंविण्यात आला होता.त्या महिलेची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांनाही हि मोठे आव्हान समोर होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस उप - आयुक्त परि ०५ , नम्रता पाटील ,बजरंग देसाई,सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग,पुणे शहर यांचा मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिस निरक्षक राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकास आरोपीचा शोध घेण्यास सांगितले.तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मृत महिलेचा शोध घेतला असता महिलेचे नाव वैशाली लाडप्पा दूधवाले,(रा.कोरेगाव भीमा ता,शिरूर,पुणे व मुळगाव रा.चिवरी ता. तुळजापूर, जि, उस्मानाबाद) असल्याचे निष्पन्न झाले.तिचे नातेवाईकांना शोध घेऊन अधिक तपास काढला असता त्यांचे एकमेकांवर प्रेम संबंध होते असे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला असता मृत महिलेचा प्रियकर महेश पंडित चौगुले ( वय २४, रा तळेगाव दाभाडे,पुणे) मुळगाव रा. चीवरी, तुळजापूर,उस्मानबाद ) तळेगाव दाभाडे,पुणे) या परिसरातून ताब्यात घेतले असता,कोण,काय अशी उडवाउडवीची उत्तरे दिली, पोलिसांनी खाक्या दाखवल्या असता त्याने सत्य परिस्थिती उघडं केली.मृत महिला वैशाली लाडप्पा दूधवाले हिचाशी प्रेम संबंध असल्याचे सांगितले. व चारित्र्य संशयावरून तिचा त्या ठिकाणी डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली.

सदर संशयित आरोपीस ०९ जुलै रात्री १ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.आरोपीला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.०५ जुलै रोजी अज्ञात मृतदेह आढळल्याने तपास करताना अथक प्रयत्न करावे लागले.मृतदेह त्या भागातील नसल्याने पोलिसांना कुठलाही सुगावा लागत नव्हता,पोलिसांनी अतिशय हुशारीने खुनाचा उलगडा केला.मृत महिलेची ओळख पटली असता तातडीने हालचाल करून काही तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या.