यवत (ता. दौंड) यवत पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ आणि जनतेत लोकप्रिय पोलीस अधिकारी बाळासाहेब गाडेकर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)
पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. ते आत्ता यवत पोलिस स्टेशनचे अंतर्गत केडगाव पोलिस चौकी मध्ये कार्यरत आहेत.
बाळासाहेब गाडेकर यांनी आपल्या सेवेत सदैव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांना सर्वोच्च स्थान दिले आहे. गुन्हेगारांसाठी ते कर्दनकाळ ठरले असून, दुसरीकडे गरजू, गरीब, अनाथ आणि असहाय लोकांसाठी ते आधार ठरले आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत कायद्याचे कठोर पालन करत असताना मानवी संवेदना जपणारा दृष्टिकोन सातत्याने त्यांच्यात दिसून आला आहे.
प्राण्यांविषयी असलेले प्रेम, अनाथ मुलांसाठी केलेले कार्य, समाजातील दुर्बल घटकांन प्रती असलेली सहवेदना यामुळे त्यांचा सामाजिक सहभागही लक्षणीय ठरतो.
त्यांच्या ड्युटी वरील निष्ठा आणि जनतेशी असलेला सुसंवाद यामुळे यवत परिसरात त्यांच्याविषयी विशेष आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.