मोफत अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे ४० पत्रकारांना पुरंधरमध्ये वाटप

Bharari News
0
सासवड बापू मुळीक
      खळद (ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ना अजित दादा पवार यांच्या वाढदिवस निमित्त अमोल कामठे मित्र परिवार यांच्या तर्फे मोफत अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे वाटप   पी . डी . सी  बँकेचे अध्यक्ष डॉ . प्रा . दिगंबर दुर्गाडे व माजी उपाध्यक्ष कृषी शिक्षण परिषदेचे विजय कोलते यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व सुनिता कसबे यांना वाटप करण्यात आले, 
अशोक टेकवडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की पत्रकार हा समाजातील सर्व तळागाळात पोहोचले असून शेतकरी सर्वसामान्य जनता यांची व्यथा मांडत आहे . कठीण परिस्तितीतील याना कोणतेही संरक्षण नाही विमा नाही तो आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून पत्रकार हा एक आधारस्तंभ असल्याचे उल्लेख केला व विमा संरक्षण पॉलिसीचे ४० पत्रकारांना वाटप झाले असले तरी पुढील आगामी काळात राहिलेले पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानुसारआम्ही राष्ट्रवादीचे पुरंधरमधील नेते पत्रकारांला मदत करणार असल्याचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सांगितले . 
माजी जि.प . सदस्य सुदाम इंगळे पी.डी.सी . बँकेचे अध्यक्ष डॉ . प्रा . दिगंबर दुर्गाडे माजी उपाध्यक्ष कृषी शिक्षण परिषदेचे विजय कोलते यांनी आपले मनोगत व्यक्त केले . 
 यावेळी शामकांत भिंताडे सहा . अधीक्षक डाक विभाग बारामती कुमटकरअमृत ,मॅनेजर किरण वाघ ,सोमेश्वर कारखान्याचे संचालक बाळासो कामठे ,बापू भोर , सरपंच दशरथ कादबाने , उपसरपंच आशा रासकर , सरपंच आश्विनी खळदकर , उपसरपंच नंदुबापू कामठे , सुनील लोणकर जिल्हाध्यक्ष, योगेश कामठे , अध्यक्ष, अमोल बनकर सचिव , विनय गुरव सोशल मीडिया अध्यक्ष, निलेश भुजबळ , किशोर कुदळे , ग्रामसेवक सुरेश जगताप, खळद ग्रा. पंचायत सदस्य, राहुल शिंदे माजी अध्यक्ष ,राजेंद्र बर्गे , दत्ता भोंगळे , प्रकाश फाळके पुरंदर तालुका कार्यकारिणी सदस्य , ग्रामस्त महिला पत्रकार , आदी व ग्रामपंचायतमध्ये गावासाठी सुद्धा डोळे तपासणी खळद मध्ये पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामठे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले .प्रास्ताविक  व सूत्र संचालन भरत निगडे यांनी केले  तर आभार बाळासो काळे यांनी मानले .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!