सासवड:प्रतिनिधी :बापू मुळीक
सासवड (ता. पुरंदर) येथील ओंकार रूपेश टपळे (वय २२) हा सनदी लेखापाल (सी.ए.) ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आमदार संजय जगताप यांनी ओंकारचे विशेष कौतुक केले. ओंकारचे वडील रूपेश रमेश टपळे हे सासवड तहसील कचेरी येथे कॅन्टीन चालवतात. ओंकारचे १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण म. ए. सो. चे वाघिरे विद्यालय, सासवड येथे झाले. तसेच बी. कॉम. गरवारे कॉलेज (पुणे) येथे झाले. त्याने जी. डी. आपटे फर्म येथे अभ्यास केला. अथक परिश्रमाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. ओंकारने सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले होते. आई रोहिणी रूपेश टपळे (शिक्षिका) व वडील रूपेश काका ,काकी,आजी ,आजोबा यांनी त्याला लहानपणापासून प्रेरित केले. यशात कुटुंबीयांबरोबरच मित्र परिवार, नातेवाईक, शिक्षक, हितचिंतक यांचा वाटा असल्याचे ओंकारने सांगितले.