आंबेगाव मिलिंद टेमकर
कळंब आंबेगाव येथील घोडनदी स्मशानभूमी जवळपास सहा शेतकऱ्यांच्या शेतीपपाच्यापाच्या मोटारी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दिनांक १४/७/२०२२रोजी लक्षात आले असून अदाजै दोन लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे.
या बाबत श्री.कमलेश सखाराम शिंदे पा.रा.अवसरी खुर्द यांच्या मालकीची जमीन कळंब येथे असून ते शेतीला फेरफटका मारायला गेले असता त्यांना तेथील त्यांची आणि इतर लोकांच्या मोटारी गेलेल्या दिसताच चौकशी केली असता त्यांचे शेजारच्या शेतकरी शंकर खंडू कानडे, दशरथ बळीराम भालेराव, बाळासाहेब अंबादास दरेकर, दिलीप बबनराव वर्हाडी ,किसन काशिनाथ पिंगळे, योगिता अनिल भालेराव सर्वच राहणार कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या सुध्दा मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी चोरांनी धुमाकूळ घातला आहे तरी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास मंचर पोलिस करीत आहेत.