दारुड्या पतीने केला पत्नीचा खून अडवणूक करणाऱ्या मेव्हणीला हि केले वार, हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bharari News
0
लोणी काळभोर अनिकेत मुळीक 
            दारूच्या नशेत पट्ट्याने मारत असल्याची तक्रार आईकडे करणाऱ्या पत्नीचा पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली. या दरम्यान, सोडवण्यास आलेल्या मेहुणीवरही वार करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेसतरानळी येथे घडली.          
नंदिनी हनुमंत पवार (वय १९) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर, मेहुणी कोमल वैजनाथ लांडगे (वय २२, रा. साडेसतरानळी, हडपसर) या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी हनुमंत धोंडीबा पवार (वय २२) याला अटक केली आहे. याबाबत नंदिनी यांच्या आई माणिक शिवाजी कांबळे यांनी तक्रार दिली आहे.          
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी नंदिनी आणि हनुमंत यांचा विवाह झाला होता. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. तिला सांभाळण्यासाठी नंदिनी यांची आई तिच्यासोबत राहत होती. तसेच मोठी मेहुणी हीदेखील तेथेच राहण्यास आहे. बिगारी काम करणाऱ्या हनुमंत याला दारुचे व्यसन होते. तो पत्नीला वारंवार मारहाण करत. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री हनुमंत हा नंदिनीला पट्ट्याने मारहाण करत असताना ती तिच्या आईला सांगत होती. याचा राग आल्याने नशेत असलेल्या हणुमंतने आईला काय सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही म्हणत धारदार चाकूने वार करून तिचा खून केला. याच दरम्यान बहिणीला वाचविण्यास आलेल्या कोमल यांच्यावरही त्याने वार केले. सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ पडसळकर अधिक तपास करत आहेत.,

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!