निपाणी प्रतिनिधी सागर श्रीखंडे
बुगटे आलुर येथे साव्यासीच गुरुकुल संचालित जिजा शिवकालीन युद्धकला गडहिंग्लज च्या मार्फत दुर्गा वहिनी यांच्या वतीने बुगटे आलूर् उन्हाळी सुट्टी निमित्त लाठी काटी मर्दानी खेळाचे संरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले,
यामध्ये लाठी काठी, तालावर बाजी, दांड पट्ट,ससंरक्षण,कराटे याच सोबत भारतीय युद्ध व शिवकालीन युद्ध कला शिवकण्यात आली यावेळी विरूपाक्षलिंग समाधी मठ निपाणी येथील प.पू.प्राणलिंग स्वामीजी सदलगा येतील गीता आश्रम मठाचे प. पू. श्रद्धांनद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व सव्याशी गुरुकुल चे आचार्य लखन गुरुजी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते,
यावेळी यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून व शस्त्राचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आचार्य लखन गुरुजी यांनी भारतीय युद्ध कला शिवकालीन युद्ध कला व संरक्षण प्रशिक्षण याचे महत्त्व सांगितले
तसेच प्रणालिंग स्वामीजी यांनी अशी शिबिरे प्रत्येक गावात आयोजित केली पाहिजेत हो गावातील प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना यामध्ये पाठवून तयार केले पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच गीताश्रम मठाचे प.पू. श्रद्धानंद स्वामीजी आजची तरुण-तरुणी मोबाईलच्या विळख्यात अडकलेले आहेत ,
यातून बाहेर पडायचे असेल तर मैदानी खेळा तसेच अशी कला आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे असे मत व्यक्त केले या शिबिर मध्ये 100हून अधिक तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर श्रीखंडे तर प्रास्ताविक श्वेताताई हिरेमठ आभार उध्दव रावण यांनी मानले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर आलूरकर,अशितोष हर्डीकर ,नंदकिशोर बामणे ,सुयश तुळपुळे ,रुपेश शिरोडकर ,प्रशांत फडणीस ,शुभ्रा काळे ,निर्मला पेठे यांनी विशेष असे सहकार्य केले,
तर या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी दीपक भादवनकर, राजेंद्र मोरे, मारुती सावंत व गुरुकुल वरील टीम हे गेली आठ दिवस त्यांना प्रशिक्षण देत होते यावेळी वैशाली पोद्दार, ज्योती साबळे, संध्या घाडेकर, प्रदीप आलूरकर , केशव आलूरकर सह विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच त्यांचे पालक त्या संख्येने सहभागी होते