मंदार निघोट खडकवासला, पुणे
पुणे शहर आणि आसपासच्या भागात काल(बुधवार) दिवसभर पावसाने जोरदार
हजेरी लावली. त्याच दरम्यान कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून ३०० मीटर
अंतरावर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना देखील
घडली.
पुणे शहर आणि धरण क्षेत्रात मंगळारपासून पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांवरील एक दिवसआड पाण्याचे संकट दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल सकाळपासून देखील शहरातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर त्याच दरम्यान शहरातील तब्बल १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.