बालगोपाळांच्या दिंडी सोहळ्याने खंडागळेवस्तीचा परिसर विठ्ठलमय

Bharari News
0

 

न्हावरा : सुजित मैड
         न्हावरे परिसरातील खंडागळेवस्ती येथील प्राथमिक शाळेत बालगोपाळांचा दिंडी सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात पार पडला.        
भगव्या पताका टाळ ,मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जप सोबतच ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा गजर करत  खंडागळेवस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना काळानंतर शाळा नियमितपणे सुरू होऊ देत, कोरोनासारख्या महामारीचे संकट सर्व जगावरून दूर होऊ देत असे साकडे विठ्ठलाला घातले.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यांनी केलेल्या महान कार्याची ओळख  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीमधून ओळख व्हावी , शेकडो वर्षाच्या वारीच्या परंपरेची ओळख व महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता  वेताळ यांनी सांगितले.दिंडीचा निमित्ताने वृक्षारोपणाचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व इत्यादी विषयांबद्दल पालकांचे उद्बोधन त्यांनी करण्यात आले.      
बालगोपाळांच्या या दिंडी सोहळ्यास खंडागळे वस्तीवरील जेष्ठ ग्रामस्थ आबासाहेब खंडागळे यांनी वारकरी रुपी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करून महाप्रसादाची व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांबरोबरच, पालक,महिला वर्ग मोठ्या संख्येने दिंडीत उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीचे मनापासून कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले. शाळेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक संतोष घावटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर खंडागळे, उपाध्यक्ष महेश दरेकर, अमोल खंडागळे, निलेश नागवडे, दत्तात्रय कोरेकर, संतोष कोरेकर, स्वाती खंडागळे, हनुमंत नागवडे,रेश्मा मोरे, फातिमा शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!